Posts

राजापूर तालुका चर्मकार समाज सेवा संघातर्फे संत रोहिदास महाराज जयंतीदिनी कार्यक्रम ...

संतांनी धर्माचा प्रचार करताना कधी जातीभेद किंवा वर्णभेद केला नाही. हिंदू धर्मातील सर्वच संतांनी ईश्वर हा एकच आहे, असे सांगितले आहे. माणसानेच जातीभेद निर्माण करून समाजात दरी निर्माण केली आहे. राजापूर : संतांनी धर्माचा प्रचार करताना कधी जातीभेद किंवा वर्णभेद केला नाही. हिंदू धर्मातील सर्वच संतांनी ईश्वर हा एकच आहे, असे सांगितले आहे. माणसानेच जातीभेद निर्माण करून समाजात दरी निर्माण केली आहे. संत रोहिदास महाराजांनी केवळ धर्माची शिकवण दिली नाही तर आई - वडिलांची सेवा हीच ईश्वरसेवा आहे, अशी शिकवणही दिली. संत रोहिदास हे त्याकाळातील आधुनिक संत होते, असे मत प्रमुख वक्ते दिलीप गोखले यांनी व्यक्त केले. राजापूर तालुका चर्मकार समाज सेवा संघातर्फे राजापूर नगरवाचनालयाच्या सभागृहात संत रोहिदास जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून दिलीप गोखले बोलत होते. संत रोहिदास यांचे जीवन व कार्य यावर बोलताना त्यांनी आजच्या समाजव्यवस्थेवर भाष्य केले. ते पुढे म्हणाले की, संतांनी दिलेल्या शिकवणीचे आपण सर्वांनी आचरण केले असते, तर समाजात ही जातीभेदाची दरी निर्माणच झाली नसती. या समाजान

रत्नागिरी : पीर बाबरशेख उरूसात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी, लाखोंनी घेतले दर्शन....

उरुसामध्ये आलेल्या लाखो भाविकांच्या हरवलेल्या काही अनमोल गोष्टी हातीस ग्रामविकास मंडळाच्या कार्यालयांमध्ये जमा केल्या जात होत्या. यामध्ये महागड्या मोबाईलपासून अनेक मौल्यवान वस्तूंचा समावेश होता. रत्नागिरी : हातीस येथील पीर बाबरशेख उरूसाच्या दुस-या दिवशी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गतवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील लाखो भाविकांनी पीर बाबरशेखांचे दर्शन घेतल्याचे हातीस ग्रामविकास मंडळाकडून सांगण्यात आले. पहिल्या दिवशी रात्री चंदनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर प्रथम हातीस व नंतर इब्राहीमपट्टण येथील बांधवांकडून बाबरशेखांच्या कबरीवर गलफ चढवण्यात आली. त्यानंतर भाविकांचे आकर्षण असणा-या शस्त्रांचा खेळ सुरू करण्यात आला. यावर्षी हा खेळ पाहण्यास भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बाबरशेखांवर श्रद्धा असणारे अनेक लोक या खेळांमध्ये जीवघेण्या शस्त्रांचा मारा करून घेतात. परंतु आजपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. यानंतर गाऱ्हाणी घालायला सुरुवात झाली. गुरुवारी दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत भाविकांची गा-हाणी चालू असल्याचे पाहायला मिळत होते. गुरुवारी पहाटेपासूनच भाविकांनी मोठ